STORYMIRROR

Sagar Gadhave

Others

3  

Sagar Gadhave

Others

पुनरावृत्ती

पुनरावृत्ती

1 min
277

भाजलेत हात पोळली जीभ उघडा पडला संसार

भंगले स्वप्न विरले नाते जीवनाचा झाला विस्तार।


कुठ मी कुठ तु नको आता पुन्हा दुनियादारी

नको ताळमेळ नको रुसवे बस्स झाली प्रेमवारी।


शुन्य झालाय सुन्न नको कशाची पुनरावृत्ती 

खचल मन मोडल धन नको कसली शाश्वती।


जिव्हाळा नको ओढ नको ना कोनती तडजोड

हरलो मी जिंकल तु झाली सगळी मोडतोड।


नको संसार नको सुख खुप झाला जीवनाचा फेरा

भुत नको भविष्य नको सोडवतोय वर्तमानाचा वेढा।



Rate this content
Log in