ओढ
ओढ
ओढ तुझी मला कसं आवरू सांग
तुझ्याविना जगणं कसं थांबवू सांग
मला नाही सुचत तुझ्याविना काही
खुप ओझं झालं जगण्यात रस नाही
घसा कोरडा पडला जगाला सांगून
तू सांग ना माझी चुकी काय झाली
नाही गं माझं मन मजबुत वरवर हसतोय
पण काय सांगू आतून पार खचतोय
जगलो वाचलो तर तुझाच सागु म्हणून राहीन
नाहीतर देवाचा सेवक म्हणून राहीन
संपलय सगळं आता नेहमी वाटतय
मेलोय मीच त्याच दिवशी जेव्हा तू मला सोडून गेलीस
वाटलं होतं जग बघू संसार करु पण तू साथ सोडून गेलीस
देवा मला काहीच नको फक्त विसरायची शक्ती दे
नाहीतर माझ्या प्रियाला भेटायची युक्ति दे
