STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Thriller Others

3  

Rohit Khamkar

Tragedy Thriller Others

शेवट संधी

शेवट संधी

1 min
162

बेसुमार झाडे तोडली, म्हणून सारं बिघडलं

हळूहळू उन्हाचं प्रेम, आपल्यावर उगीच का वाढलं


प्राण्यांचिं घरं हिसकावली, अनं झालो आम्ही मालक

मग मानवी वस्तीत प्राणी आले, हळू हळू चालक


त्यातही आमची घाई, सारे क्षण चित्रित करण्याची

कंटाळा आला कि वेळ येते, वन खात्याला बोलवायची


सारी वाटते आम्हांला गंमत, आम्ही सांगतो त्याचे किस्से

निसर्गही मग असा कोपतो, देऊन टाकतो आपापले हिस्से


समतोल सारा ढळतोय, प्रगतीच्या नावाखाली विनाश ओढावतोय

ह्रूतू सारे उग्र होऊनी, सारं संपण्या आधी शेवट संधी देतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy