शेवाळ
शेवाळ
हिरवा हिरवा गार गालिचा
घ्यावा वाटे त्याचा गालगुच्चा
मऊ मुलायम तलम रेशमी
स्पर्श प्रेमळ जणू वेलवेटचा...
बारीक मृदू वनस्पती ही
ओळव्यात झटकन वाढे
आपल्याच सौन्दर्याने
सारी भिंत लीलया भरून काढे...
थोड्या अवधीचे तिचे जीणे
तरीही काही नसते उणे
इतकाच धढा शिकूवून जाते
वर्तमानाचे असावे आनंदी जीणे....
ठेविले अनंते तैसेची रहावे
हे तीच्याकडून शिकावे
मिळालेल्या संधीचे सोने करावे
हे जणू तिने सांगावे..
पटले मला ते तिचे जीणे
काहीच ठेवत नाही ती उणे
पावसाळ्यात ती कोठेही फुलते
तिला पाहताच जीवन खुलते...!!!
