शेतकरी
शेतकरी
शेतकरी कष्ट करी
शेतांमधी दिन रात
राबतात दिसभर
माया बापाचे हो हात.....
अनवाणी पायामंधी
रुते मूचकुणी काटा
फांदी तून चालताना
लई भयाण या वाटा.....
ऊन , वारा, पावसाचे
मार झेलावे लागते
भार सा-याच ऋतूचे
पेलताना मी पाहते.....
घाम गाळी रानामंधी
बाप झिजवीत काया
येत नाही देवाला ही
त्याच्या लेकराची दया.....
पिकं रानात आलेली
नाही लागतं हो हाती
कशी झाली देशाच्या या
पहा पोशीद्यांची गती.....
राजा हा देशाचा कसा
हळूहळू होत गेला दास
हरलेला बाप माझा
घेतो अखेरीस गळफास.....
