शेतकरी बाप माझा
शेतकरी बाप माझा


शेतकरी बाप माझा
घाम गळतो दिन-रात
प्रामाणिक शेतकरी तो
फळा येईल मेहनत
माझ्यासाठी केली
त्यांनी खूप कष्ट
हात नाही फैलावले
सावकारा कडे स्पष्ट
शिकून मोठे साहेब
व्हावे उरी आशा मोठी
हसतमुखाने शपत जगला
दुःख लपवून आम्हासाठी
काहीं ना कमी पडू दिले
कधी त्रास मधील केव्हा
जगी उद्धार केला
जन्मोजन्मी हाच बाप हवा
जन्मोनी पुन्हा यावे
पांग फेडण्यासाठी
आई-वडिलांची पुण्याई
हे जगा दाखवण्यासाठी