STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

1.9  

Vasudha Naik

Inspirational

*शेकोटी पेटवू या.*

*शेकोटी पेटवू या.*

1 min
30.5K




आला हिवाळा

पडली थंडी

उबदार घालू बंडी

घालूया लोकरीचे कपडे

मऊ मऊ उबदार

दिसायला छानदार

आला हिवाळा.....


हवेतला गारवा

झोंबतोय अंगा

पेटवू शेकोटी

घालू पिंगा

आला हिवाळा,....


शेकोटी भोवती

नाचू,गाऊ ताल धरू

हाती हात घेवू

गोल फेर धरू

आला हिवाळा....

पडलाय गारवा

शेकोटी पेटवा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational