शब्दवीर
शब्दवीर
मराठी सक्षमीकरण्याची तलवार,
घेऊन हाती कित्येक लढती शब्दवीर
शांत, मृद्गंध क्रांतीची बीजे पेरत,
काव्यत्व उमटे अखंडी झरस्त्रोत
कर्तृत्वाची ज्योत पेटवी विश्वांगणी,
सप्तरंगाची बहार फुलवी तारांगणी
परिसस्पर्श आनंद नसानसात तेवत
वैविध्य संस्कृती अष्ट दिशा प्रांजळीत
ओवी, अभंगातून वाहे अमृताचे झरे,
ज्ञानदेव, तुकोबाची गाथा सुख पाझरे
रामायण, महाभारत, गीता संघर्ष धडे,
पुर्णत्व जीवनाचे हळूच कोडे उलगडे
देशभक्ती, पोवाड्यातून झंझावात लाटा,
गझल, प्रेमगीतात सप्तसुरांच्या वाटा
जगाचे ऋण फेडे, देहभान विसरत,
पाऊलखुणा सुगंधी धूप परिमळत
व्यासपीठी लखलखती शब्दवीर तारे,
मराठीच्या रक्षणार्थ सर्मपित ही सारे
तेज:पुंज होत लढे अक्षर पेरणीचे वारे,
खंबीर नेतृत्वाने पारखे अनमोल मोहरे
