STORYMIRROR

Kshitija Bapat

Inspirational Others

3  

Kshitija Bapat

Inspirational Others

शौर्य

शौर्य

1 min
632

साहस तिच्या स्त्रीत्वात

शौर्य दाखवले मैदानात

देऊन तलवारीला धार

झाली ती घोड्यावर स्वार


बाळ बांधून पाठीला

इंग्रजांना दिला लढा

लक्ष्मीबाई शूरवीरा  

तीच आहे कर्तृत्वाचा झरा


शौर्याच्या कथा तिच्या

प्रत्येक जणांच्या मुखात

इतिहास घडविला मर्दानी राणी ने

जणू आतिशबाजी नभात


तिच्या नावाचा झेंडा

फडकला जगभरात

खुप लढली राणी

अमर झाली तिची कहाणी


केली तीने उदगार

मी माझी झाशी नाही देणार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational