STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

शौर्य

शौर्य

1 min
192

आजपर्यंत तुम्ही मला अबला समजलात

पण मी आहे सौदामिनी

वीज बनून जाळेन तुम्हाला


आज तुम्ही माझ्याबरोबर कसे वागता?

एक तर मला गर्भातच मारता

नाहीतर जिवंतपणी नरकयातना देता


पण आता हे नाही चालणार

बस्स्ं झाला आता आमचा छळ

आता सावित्रीच्या लेकी जाग्या झाल्यात


स्त्री म्हणजे काय खेळ वाटला?

हव्यासासाठी, भोगासाठी स्त्री हवी

एरवी तिची किंमत पायदळी


नाही, आता असे होणे नाही

नाही आता आम्ही तुम्हाला भोगायला मिळणार

नाही तुमच्यासाठी झिजायला मिळणार


आज स्त्री शिकून शहाणी झालीय

पूर्वीची साधीभोळी स्त्री आता विसरा

स्त्री आता चूल आणि मूल? विसरा


आता तुम्हाला आम्ही धडा शिकवणार  

पाशवी, रानटी भ्याडांना पळवून लावणार


आता आम्हीच आमच्या संरक्षक

खबरदार, आमची छेड काढली तर

नको आम्हाला हपापलेले बॉडीगार्ड


रुपवती गर्विता मी, बनले आता

मर्दानी झाशीची शूर राणी

घेऊन हाती स्वसंरक्षणाची तलवार

सपासप कामांधांवर वार करणार


अबला म्हणून म्हणून खूप छळले

आता सबला बनून माझं स्त्रीत्व दाखवते

रणांगणात उतरलेली मर्दानी मी

मलाला बनून नराधमांना धडा शिकवणार


नको माता-भगिनींची जबाबदारी काय

आता आम्हीच तुमचा त्याग करणार

नाही देणार खानदानाला वारसा

नाही सजवणार तुमची शय्या


होऊन ताकदवान आम्ही लढणार

आमचा मार्ग आम्हीच शोधणार

आम्हीच आमची ढाल बनणार

आम्हीच स्वतःला "मर्दानी" बनवणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational