शास्त्र
शास्त्र
अजब आहे जीवनाच अविरत शास्त्र
परिधान कराव लागत सोशिकतेच वस्त्र
शांततेचा नेहमी पांघरून घ्यावा शेला
संस्कारांचा सदैव भरलेला असावा पेला
अनेक चढाया संयमानं कराव्यात सर
लोकांच्या बाजारात मिळेल तेव्हा दर
विरोधकांना विरोध करण टाळाव
समजुतीने मत नेहमी त्यांच वळवाव
अंतःकरण शुद्ध अन निर्मळ असावे विचार
सहजच बदलून जातात आपले आचार
सामंजस्याने पराभव ही टाळता येतो
निःशब्द राहूनही विजय मिळवता येतो
