STORYMIRROR

Jyoti gosavi

Children

3  

Jyoti gosavi

Children

शाळेची मज्जा

शाळेची मज्जा

1 min
279

ये रे ये रे काऊ

तुला देतो खाऊ

 लॉकडाऊन संपणार

 कधी सांग मला पाहू


 आता मला घरात बसून

 आलाय कंटाळा 

असं वाटतं कधी एकदा

 उघडेल माझी शाळा


शाळेत जाईन दप्तर घेऊन

 गणवेश घालीन छान 

मस्ती करेल मित्रांशी

 पण ओढणार नाही त्यांचे कान


डब्यात दे पोळी भाजी

 सॅंडविच पण दे कधीतरी

 चालेल मला सारे काही

 पण राहायचे नाहीआता घरी


माझे मित्र आणि मैत्रिणी 

 माझे सर आणि बाई

सगळ्यांना भेटण्याची

बघा झाली मला घाई


खडू आणि फळ्या ची मज्जा 

ऑनलाइन शिक्षणात नाही

 शाळेतली सारी धिंगाणा मस्ती

 एकट्याने करता येत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children