STORYMIRROR

Renuka D. Deshpande

Inspirational

4  

Renuka D. Deshpande

Inspirational

शाळा , मित्र आणि बाके

शाळा , मित्र आणि बाके

1 min
784

शाळा झाली रे झाली सुरू..

तयारी आम्ही जोरदार करू..

घेऊ पाटी, घेऊ दप्तर, घेऊ डब्बा, घेऊ पुस्तक..

जाऊ शाळेत,शिकू मस्त , मित्र बनतील मग पुस्तक...


बाकांवर बसू शिकू नवनवीन धडे..

बाकांवरच आपली नवीन मैत्री घडे..

कित्येक आठवणी बाके आपल्या सोबत साठवतात.. 

बाकांजवळ जाताच त्या आपल्याला आठवतात..


आनंदाचे क्षण असो वा असो छोटी छोटी भांडणे..

साऱ्याच गोष्टी घडतात बाकांच्या साक्षीने...

शाळा, मित्र असो वा असो बाके..

इथे कोणी नसते हो कोणा परके..


जीवनाचा आनंदी काळ असतो शाळेचा..

बुद्धिमत्तेला वाव मिळतो , नवीन काही करण्याचा..

शाळा असो वा जीवन मित्रच असतात सहकारी..

मैत्रीत असते हो सगळ्यांची समान भागीदारी..


सुख दुःखांत सदैव असते साथ हो ज्या मित्रांची ..

कोणीच पूर्ण करू शकत नाही कमतरता त्यांची..

शाळेच्या त्या आठवणी सदा स्मरणात राहतात..

कधी ही आठवल्या की मनाला आनंदी करतात..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational