शाळा कधी भरणार
शाळा कधी भरणार
शाळा एकटी पडली
मुलांविना पोरकी झाली
शाळेची घंटा खणखणत नाही
आवारात प्रार्थनेचा नाद नाही
मधल्या सुट्टीची मजा नाही
मुलांचं खेळावरून भांडण नाही
सगळं कसं नुसतं शांत
वाटे ह्याची तिला खंत
शाळेचे बदलले स्वरूप
मुलांना आठवण येई खूप
गोंडस, निरागस मुले
जणू बागेतील फुले
मुले कधी गणवेशात दिसणार
मुलांचा किलबिलाट कधी होणार
साफ कधी होणार धुळीचा थर
गजबजून जाणार कधी परिसर
शाळा कधी पहिल्यासारखी भरणार
शाळेच्या पटांगणात मुले कधी धावणार
कधी हे सारे चित्र बदलणार
घसरगुंडीचा आस्वाद मुले कधी घेणार
भाषणांचा आवाज कधी घुमणार
अभ्यास कधी शाळेत शिकवणार
