Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Kendre

Inspirational Children

4.0  

Varsha Kendre

Inspirational Children

शाळा भरली

शाळा भरली

1 min
386


 टेबल-खुर्ची फळे

 होते कोंडलेले

 घरोघरी दिसत मुले

 ऑफलाईन शाळेस मुकलेले-1


घराघरातील आवाज मुलांचा 

शाळेत येत नसे ऐकू

शाळेतील क्रिडांगणास 

मुले लागत होती मुकु-2


 दीड -दोन वर्ष कालावधीनंतर

 शाळा भरली आज

 माथ्यावर बालगोपाळांच्या

 चढला आनंदाचा ताज-3


 विद्यार्थ्यांच्या अंगावर

 पहा गणवेश चढले

 हातातील पिशवीत 

 डबेही सजले-4


 हसण्या बागडण्याने

 फुलू लागल्या शाळा

 शाळा बसेसही आता

 होतील साऱ्या गोळा-5


 गुरुजींच्या आवाजाने,

 वर्गभिंती दुमदुमतील

 पालकांचे ओझे सुद्धा

 कमी होताना दिसतील-6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational