STORYMIRROR

Saroj Gajare

Inspirational

0.7  

Saroj Gajare

Inspirational

शाहिदांना श्रद्धांजली

शाहिदांना श्रद्धांजली

1 min
900



धन्य ती माय माऊली

देशासाठी अर्पि तुला ।।१।।

करी जडणघडण अशी

वाघाची जिगर जशी ।।२।।

हत्तीचं बुद्धी बळ अन

गरुडाची नजर जशी ।।३।।

आर्मी ट्रेनींग म्हणजे

शिस्तीचा कडक प्रहार ।।४।।

अठरा वीस वर्षाचा तू

सोशी सियाचीन कहर ।।५।।

तुडविशी हिमशिखरे

शूरवीर तू साहसी ।।६।।

हाती धरुनी शस्र

रात्रंदिन जागशी ।।७।।

देशासाठी सदा तत्पर

तुझी ती निधडी छाती ।।८।।

वाघाची ही असली छाती

पण भ्याडांनी अशी फाडली ।।९।।

कपटी कारस्थान्यांनी

ध्येये तुझी चिरडली ।।१०।।

तळपट होवो मेल्याचे

शाप त्यांना वीरांगनांचे ।।११।।

त्यांचीही होवोत शकले

नतद्रष्ट दहशतवादयांचे ।।१२।।

शव पाहता तिरंग्यातील

सार कुटुंब ते कोसळत ।।13।।

मतलबी राजकारणी

काही धडे घेतील का?।।१४।।

एक तप कसाब पोसणारे

शहीद कुटुंबा पोसतील का?।।१५।।

मुर्दाड्यांच्या देशात

आम्हीही झालो मुर्दाड ।।१६।।

वीरांगनांचे कुंकू पुसून

घास उतरतो नरड्यातून।।१७।।

धिक्कार असो अशा जिण्याचं

रक्त ज्यांचं गारठलेलं

रक्त ज्यांचं मुर्दाडलेलं।।१८।।

लाख मोलाचे भाग्य

प्रेमदिनी देशप्रेमी गेले।।१९।।

रक्तरंजित देशी गुलाब

भेकडांनी कुस्करले।।२०।।

ऐकता हा समाचार

काळजात झालं चर्र ।।२१।।

सुन्न झालं शरीर

झाल्या संवेदना बधिर।।२२।।

अशा या वीरांचे म्हणुनी

व्यर्थ न जाओ बलिदान।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational