सगे
सगे
गज बज सग्या सोयर्यंची सरली
जरा निवांत आज वेळ जाहली
क्षण गोठल्या नांदीची उजळणी
मना आठवणी घाली समजावणी
सोबतीचे तारे नक्षत्रही थिजली
नभी चांदणी भासती का एकली
क्षणार्धात कोसळतो अंगावरी
भाव भावनांचा खेळ नभांतरी
कास जिवाशी श्वासाची कसली
वाट आयुष्याची चालते एकली
सांज नभीची मनात साठवलेली
अमूर्त एक म्हण येतसे ओठावरी
संग सोबतीस साथिच्या आशेवरी
काहून जगशील तू या मरणराशी
क्षण विरल्या नात्यातील गोडवा ही
गाठ पडते coffeeची ही सग्यांशी
