STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

सेवानिवृत्ती

सेवानिवृत्ती

1 min
902

आयुष्याच्या वळणावरचा जणू 

अंतिम टप्पा सार्थकतेचा पूर्णतेचा

परिपूर्णतेचा उन्नतीचा सेवानिवृत्तीचा 


सेवानिवृत्ती ही नाही निवृत्ती  

ही तर आहे चाकोरीबद्ध आयुष्य 

सोडून निवांत जगण्याची आवृत्ती  


सुखाची, समाधानाची, गोडी

 आगळी ही कर्तव्यपूर्तीची  

जाणीव सुखाची निवृत्तीची 


 अपूर्ण राहिलेले छंद जोपासून त्यात रममाण होण्याची 

 आरामात उठून चहा घेत  

पेपरवर हळुवार दृष्टी फिरवण्याची 

नाही लगबग घाई आता राहत ऑफिसला जाण्याची 


 निवांत अंघोळ, निवांत दर्शन पूजा मग जेवण

 करतात मनाची तृष्टी  

सायंकाळी निवांत वेळेत बागेत चक्कर मारून 

जीवाला थोडं बरं वाटत कुणाचातरी

सहवास लाभतो म्हणून बदलत जाते 

धावपळीच्या जीवनातील वृत्ती  


कमी आयुष्य राहिले म्हणून याची खंत न करता 

 मनसोक्त आयुष्य जगण्यासाठी

 मिळालेली असते ही सुट्टी

लहान थोरांना आपलेसे करून 

त्यांच्याबरोबर होते मग चांगली गट्टी  


कुटुंबाची जबाबदारी पेलत कष्ट केले असतात

अपार आताही सेवानिवृत्तीची वेळ म्हणते

 थांबा जरा आणि करा आता थोडा आराम 


 सेवानिवृत्तीचा मार्ग वेगळा हा जीवनाचा

 तृप्त मनाचा ऐहिकतेच्या विलोपनाचा 

भौतिकतेच्या निरोपाचा...🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract