STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational

3  

Sapana Thombare

Inspirational

सडा फुलांचा

सडा फुलांचा

1 min
499

झोपेतून उठले मी सकाळी बघता बाहेर

फुलांचा सडा पसरलेला होता सड्यावर


 झाडे टवटवीत झाली होती बहरलेली

 धुक्याचा ओलावा दिसत होता फुलांवर


 पूर्व दिशेला सूर्य उगवुनी दिवस उजाडला

 सूर्य कोमल सुंदर दिसत होता पहाडावर


 गार वाऱ्यांनी झाडे फुले हलू लागली

 फुलांचा सडा खाली पडत होता मातीवर


 शोभा माझ्या अंगणी फुलांनी आणला

 निसर्ग खुश होऊनी हसत होता झाडांवर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational