STORYMIRROR

Vimal Patkari

Inspirational

3  

Vimal Patkari

Inspirational

सदभाव संदेश

सदभाव संदेश

1 min
163

आले आले नवीन वर्ष

सदभाव संदेशासह देण्या मनी हर्ष

कर्तव्यदक्षतेचे घेवुनिया पर्व

आले आले नविन वर्ष !!


लिंग निदाना करुनी मज्जाव 

लेक वाचवा-शिकवा राबवू या अभियान

नारीची सारी थोरवी जाणून 

स्री जन्माचा कराया गर्व !!आले आले !!


पाणी अडवा पाणी जीरवा 

सारे मिळुनी उपक्रम राबवा

जाणुनिया जलसाक्षरता 

जीवन बचतीचा सांगाया मार्ग!!आले आले!!


वर्षा राणी का हो रुसली

ध्यानी आणा सारे मिळुनी

जंगलतोड ही सारी थांबवुनी

कराया हो वृक्षारोपण संवर्धन!!आले आले !!


सारा भारत करण्या साक्षर 

निरक्षरांना शिकवू मुळाक्षर

हाती देवून पाटी-लेखणी

साक्षरता अभियान कराया पुर्ण!!आले आले !!


समता-बंधुता आणी एकता

महात्मा फुलेंची शिकवण ध्यानी घेता

श्वास घेवुनी माणुसकीचा

जोपासण्या हो मानवधर्म!!आले आले!!


फुलण्या जीवनी नंदनवन 

सत्कृत्त्यांचे करू अवलंबन

एकमेका देवुनी आनंद 

नववर्षाचे करू अभिनंदन !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational