STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

सौंदर्य मनाचे

सौंदर्य मनाचे

1 min
263

शरीर सौंदर्या भुलुनी

मी व्यर्थ नाही दमणार

सौंदर्य मनाचे जाणूनी

खरी सुंदर मी होणार   (१)


शरीर सौंदर्य क्षणिक 

भर असे तारुण्यामधी

ओसरता जवानी मग

लयास हळूहळू जाई   (२)


संवेदनशील मनाने

संकटग्रस्त जाणणार

चैन मजेला विसरुनी

मी मदतीस धावणार   (३)


अनाथ अपंग कितीक

हालआपेष्टा जाणणार

हात मदतीचा देऊनी

तया आनंदी करणार   (४)


नितळ मनाचे सौंदर्य 

शाश्वत नि चिरंजीवी

मज हर्षभरे खुलवी

हे जीवन सार्थकी लावी  (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational