सैनिक-कविता
सैनिक-कविता
आम्ही सैनिक तयार आहे
शस्र आमचे सज्ज आहे
विश्वास आमचा तोडू नका
घातपात आमचा करू नका
मानवधर्म आम्ही पाळतो
शांतीचा संदेश जगास देतो
अंत आमचा पाहू नका
संयम आमचा संपवू नका
आम्ही भारतीय वीर जवान
देशाचे रक्षण हाच सन्मान
धीर तुम्ही सोडू नका
शत्रुला आता सोडू नका
लढने आमचा बाणा आहे
वतन रक्षण अभिमान आहे
शत्रुला आश्रय देवू नका
उगाच त्यांना पोसू नका
बलिदानाची आठवण आहे
रक्त आमचे सळसळते आहे
वाईट आमचे चिंतू नका
नजर वाकडी करू नका
ताकत आमची वाढत आहे
जगास सारे ठावुक आहे
कमजोर आम्हांला समजू नका
युद्ध करण्यास भाग पाडू नका
