सावराया हवे आता (अष्टाक्षरी)
सावराया हवे आता (अष्टाक्षरी)
आली महामारी अशी
थांबवाया तिला जाता
व्हावे स्थानबद्ध घरी
सावराया हवे आता
उतावीळपणा नको
गर्दी बाजारात जाता
राखायचा दुरावाच
माल पिशवीत घेता
मन ठेवा शांत सदा
राहो चांगला आचार
सरणार दिस बघा
नको वैफल्य विचार
घ्यावा सकस आहार
करा ध्यानाची धारणा
करा मदत गरीबा
असू द्यावीत करूणा
नर्स डॉक्टर पोलीस
देवदूत समजावे
सेवा त्यांची रात्रं-दिन
उपकार आठवावे
श्रद्धा असावी सदाच
मार्ग चोखच धरावा
जीवदान नवा जन्म
दान संकल्प सोडावा
