सावर रे मना...
सावर रे मना...


पुन्हा ते गुंतने आणि गुंतून तुटने नको.
खूप कष्टाने सावरले आहे मी मन माझे,
पुन्हा त्या वाटेवर चालणे नको.
हासू तुझे छानच आहे ,पन आता भुलवू नको.
गालावरच्या खळीत जीव वेडा गुंतवू नको.
अथांग डोळ्यात तुझ्या मन माझे अडकले होते,
बाहेर पडताना तेच मन रक्तबंबाळ झाले होते.
तुकड्या तुकड्या मध्ये आता जगणं नको रे,
बस झाले आता,मना माझ्या सावर रे.
अंगणात माझ्या येऊन पाऊस ,तुझीच सय देतो.
चिंब चिंब तुझ्या आठवणीत ,नकळत भिजवून जातो.
सांगून पावसाला माझी व्यथा,आतून मी तुटते.
सोबत आहेस तूच समजून अंगा अंगावर पाऊस मी झेलते.
चिंब चिंब भिजते मी वेड्या,पण मन मात्र कोरडेच राहते.