STORYMIRROR

Sanjeev Borkar

Inspirational

4  

Sanjeev Borkar

Inspirational

सावली

सावली

1 min
228

अगदी गर्भातल्या कोंबापासून

ती असते जगण्याची प्रेरणा

आई, पत्नी, बहीण, दाई

अनेक रुपात पाहिले मी तिला


ती आहे कधी न संपणारी ऊर्जा

धगधगत असते 

सुखात, दुःखात, प्रेमात

नात्यात, गोतावळ्यात

कुणाच्या मनात, कुणाच्या हृदयात

आसवांत, तर कधी

नुसतीच असते क्रांतीच्या सोबत

मशाल बनून

गाजवत असते प्रेरणादायी अधिराज्य


ती असते कधी न विझणारी 

दिव्यातील वात, सतत प्रकाश बनून

देत असते प्रेरणा न खचण्याची

कधी होते सावली, कधी माऊली

कधी असते ती उकिरड्यावर

कब्रस्तान, मंदिर मशीद, विहारात

वेड्यांचा वस्तीत, मानवतेचे संदेश पेरत

पण शेवटी असते ती एक अद्वितीय शक्ती

अनाकलनीय वास्तव, आणि

जिवंतपणाची प्रेरणा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational