STORYMIRROR

Aruna Garje

Inspirational Others

4  

Aruna Garje

Inspirational Others

सावली...

सावली...

1 min
5

मोठ्या वृक्षाच्या छायेत

कसे वाढावे रोपटे 

जरा मोकळ्या हवेत 

राहू द्यावे हो एकटे


कसे वाढेल बिचारे

सदा सावली वृक्षाची 

नाही उन वारा पाणी 

कशी वाढ व्हावी त्याची


कधी उन्हाचे चटके

कधी धुवाधार पाणी

कधी मजेत ऐकेल

गोड पाखरांची गाणी


नको धराया सावली

त्याचे त्याला शिकू द्यावे 

संकटाशी झगडत 

कसे आकाशा भिडावे


एक दिवस होईल

डेरेदार वृक्ष तोही

पशू पक्ष्यांना आधार 

पांथस्थांना सावलीही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational