सावित्रीमाई
सावित्रीमाई
सावित्री माई तु स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी चं
जन्म घेतलास या धरतीवर
इतकं सोपं नव्हतं सगळ तुझ्यासाठी
प्रत्येक पावली तुला हालअपेष्टा सहन करावी लागली
इतकचं कायं तु शेणाचा,
दगडाचा मारा ही सहन केलास अगदी हसतमुखाने
आणि ज्योतीबांच्या साथीने तु प्रत्येक पावलावर
या समाजाला स्वतःच्या नजरेतून बघितलं
तुझा मायेच्या पदराखाली घेऊन तु त्या काळी
पुण्यात पहिल्यांदा मुलींना अक्षरओळख करून दिली
आणि त्यामुळे च आम्हा मुलींना आज हे शिक्षण घेता आले
खरेतर कधी कधी मी विचार करते तेव्हा वाटते
तु नसतीस तर त्या चूल आणि मूल च्या कचाट्यातून
आमची सुटका कोणी केली असती?
आजं जिथे जागोजागी, 'नारीशक्ती जिंदाबाद' ,
असे म्हणतं स्त्रिया जयघोष करत असतात ती नारीशक्ती
कुठे चं दबली गेली असती या पुरूषप्रधान संस्कृतीत
तु नसतीस तर
तु स्वतः शिकलीस आणि आमच्या सारख्या इतरांना
ही शिक्षणाची वाट मोकळी करून दिलीस
तु खूप काही दिले आहेस आम्हाला
म्हणूनच आज शिक्षण घेऊन आम्ही मुली या समाजात
पुरुषांच्या बरोबरीने उभे राहून लढे देत आहोत रोज जगताना
सावित्री माई लढाई तुला ही चुकली नव्हती
आणि आता हीचं लढाई रोज तुझ्या लेकींना ही करावी लागतेय गं
तुझ्या लेकींना शिक्षणाची वाट तु मोकळी करून दिलीस
पण अजूनही या समाजात वावरताना तिला,
'स्त्री जन्म' म्हणून कुठेतरी तडजोड करावी च लागते
अजूनही तिला स्वतःच्या आवडीनिवडी,
स्वतःचे निर्णय बाजूला ठेवावे लागतात कधीतरी
हे असेच चालू राहिले तर भविष्यात ही
प्रत्येक बाईला हा लढा देत देत च जगावं लागेल
म्हणून मला वाटते की आता आजच्या 'स्त्री', ने नुसतेच,'
आम्ही सावित्रीच्या लेकी', म्हणून चालणार नाही,
आणि नुसतेच शिक्षण घेऊन ही चालणार नाही
तर स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचे विचार
तिने तडजोड न करता व्यक्त करायला हवेत
तरच कुठेतरी ही रोज समाजात चालू असलेली तिची,
'बाईपणाची', लढाई हळू हळू कमी होईल.
तुझ्यावर लिहिण्यासारखं खूप आहे गं सावित्री माई
आणि हा एकचं दिवस नाही गं तुला आठवण्याचा
कारण रोजं मी जेव्हा माझ्या शब्दांतून व्यक्त होते इथे
त्या प्रत्येक शब्दांमध्ये मला तु दिसतेस
कारण या शब्दांची ओळख आणि वारसा तुचं दिला आहेस मला.
