STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Classics

3  

SUNITA DAHIBHATE

Classics

सावित्रीच्या लेकी

सावित्रीच्या लेकी

1 min
223

आपण आहोत महान माय सावित्रीच्या लेकी

का बाळगावी मग मनात या कुणाची भीती।।


कुमारी माता व वाळीत टाकलेल्या स्त्रीयांच्या,

खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या क्रांतिज्योती।।


शिव्या शाप दगड धोंडयाचा मार सहन करुन

घडवून आणली त्यांनी स्त्री शिक्षण क्षेत्रात क्रांती।।


साऊच्या उदरात जन्मले स्वप्न स्त्री स्वातंत्र्याचे

आशिर्वादाने त्यांच्या घटट् पाय रोविले धरणीवरती।।


चुल-मुल सर्वस्वी जबाबदारी सांभाळुनही

आपण करीत आलो आहोत प्रत्येक क्षेत्रात क्रांती।।


खाचखळग्याच्या संसारातही तक्रार न करता

आपण नेहमीच फुलवत नेली संसाराची ज्योती।।


स्त्री शक्तीचा आजच्या दिनी करुया जागर, 

अडचणींवर मात करून निर्धास्त जगण्यासाठी।।


नमन करूनी क्रांतिकारी सावित्रीमाई यांना, 

सुदृढ आणि सबला होऊया अखंड नारी जाती।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics