STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Others

1  

SUNITA DAHIBHATE

Others

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया

1 min
42

हेवा वाटतो मला

तप्त उन्हात फुलणा-या त्या फुलांचा

किती नाजुक असतात ना ती

तरीही तप्त उन्ह सोसत असताना,

त्यांच्यावर त्याचा किंचितही लवलेश नसतो


तप्त उन्हातही वा-याची झुळुक येताच

मनाला फुलवुन जातात

तप्त उन्हातही मनात

नविन जगण्याची आशा फुलवतात

मनाला सुखावतात


कसं जमत ना त्यांना

तक्रार न करता सगळंच

कितीही उन्हाच्या झळा लागल्या तरी

त्यांच्याकडे पाहुन मन सुखावुन जातं

आयुष्य जगणं नकळत सुखकर होऊन जातं


तप्त उन्हातही आनंदाने

वा-या बरोबर ते झोके घेतात

निसर्गाची खरंच किमया आहे

त्या पिंपळाची तप्त उन्हात

पानगळ सुरू होऊन कोवळी पालवी फुलते


कोवळी इवलुशी पोपटी नाजुक पानं पाहीली की,

मन पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहण्यासाठी झेपावते

किती सुंदर आहे ना हा निसर्ग

सळसळणारी पाने जणु

मधुर संगीताच्या तालावर नाचत असतात


प्राजक्ताचा फुलांचा सडा पाहीला की

मनामधे त्या रंगांची उधळण होते

अचानक येणारा वळवाचा पाऊस

अचानक येऊन चिंब चिंब भिजवुन जातो

आणि त्याचा स्पर्श सुखावून जातो


सुसाटयाच्या वा-यासोबत झाडांचा होणारा

पाना फुलांचा वर्षावात मनही आनंदी गीत गाते

उंच उंच डोंगरावर इवलीशी झाडे पाहीली की

मन हरखुनच जाते

इवल्या इवल्या झाडांसोबत

मन ही इवले इवले होऊन जाते


त्यांच्यासोबत पुन्हा भातुकलीचा

खेळ खेळावासा वाटतो

किती प्राशले तरी अपुरेच पडते

किती गोड असते ना थंडगार झ-याचे पाणी


अन् त्या समुद्राच्या लाटा

काय वर्णावी त्यांची किर्ती

त्यांचा सुखद स्पर्श होताच

रोम रोम पुलकित होतो

किती खेळावे लाटांसोबत,


किती असतात अवखळ आणि खटयाळ

आल्या आल्या म्हणतात

आणि क्षणात भिजवुन दुर दुर पळुन जातात

पुन्हा भेटण्याची ओढ लावुन

आनंदासाठी इतकं पुरेसं आहे ना?

                 


Rate this content
Log in