आठवणींचे रंग ......
आठवणींचे रंग ......
रांगोळीत रंग भरताना,
आठवण मला तुझी झाली....।।
तुझ्या आठवणींच्या रंगांनी,
रांगोळी माझी पुर्ण केली...।।
फुलांची माळ गुंफताना,
आठवण मला तुझी झाली....।।
मनातील माझ्या भावनांची,
फुलांच्या माळेत गुंफण केली....।।
देवाची पूजा करताना,
आठवण मला तुझी झाली....।।
देव्हा-यातील देवाला,
भेटीची तुझ्या मागणी केली....।।
साज शृंगार करताना,
आठवण मला तुझी झाली....।।
आरशात पाहूनी मला,
लाजेने मान खाली गेली....।।
पंगतीला ताटावर बसताना,
आठवण मला तुझी झाली....।।
तुझ्या आवडीची बासुंदी,
तुझ्यासाठी राखूनही ठेवली...।।

