STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Others

3  

SUNITA DAHIBHATE

Others

गावाचे बदलते स्वरुप..!

गावाचे बदलते स्वरुप..!

1 min
215

राहीली नाही आजी अन् राहीली नाही पोरं,

अनोळखी वाटू लागली गावाकडची पाखरं ।।1।।


उरला नाही आता गुरांनाही चारा हिरवागार,

पैसा आला हातात अन् विकलं आहे शिवार ।।2।।


राहीला नाही पार अन् पारावर लहानथोर,

पारावरच्या गप्पांनाही राहिला नाही जोर ।।3।।


गावाकडच्या पोरांना लागलं शहराचं वारं,

घराकडं राहीलं आता म्हतारी अन् म्हतारं ।।4।।


शहरातल्या दुधात असतो पाण्याचाच मार, 

लेकरांना मिळत नाही पहिल्या दुधाची धार ।।5।।


सर्वानाच आवडतो आता पिझ्झा अन् बर्गर, 

पहिल्या सारख्या दिसत नाही चिंचा अन् बोरं।।6।।     


कुलुप बंद झाली आहेत जणू मनाची दारं,

प्रेमाच्या नात्यांचाही पडत चाललाय विसर ।।7।।


माणसातील माणुसकीची झाली आहे हार,

जो तो आपल्या पैशाच्या जीवावर उड्या मारं।।8।।


सगळयांच्या जीवाला जणू जगण्याचा घोर,

जगणं झालंय घडीचं अन् मरण झालंय थोरं ।।9।।


Rate this content
Log in