STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Others

3  

SUNITA DAHIBHATE

Others

तू सोबती हवा आहेस....!

तू सोबती हवा आहेस....!

1 min
340

चांदण्या रात्री हात हातात घेऊन फिरायला,

तू सोबती हवा आहेस....!


वेणीत माळलेल्या फुलांचा सुगंध घ्यायला,

तू सोबती हवा आहेस......! 


गुलाबी थंडीत उबदार मिठीत विरघळायला,

तू सोबती हवा आहेस......!


साजशृंगार करून सोबत माझ्या मिरवायला,

तू सोबती हवा आहेस......!


निराशेच्या क्षणी आशेचा किरण फुलवायला,

तू सोबती हवा आहेस......!


आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोबतीला,

तू सोबती हवा आहेस......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन