STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Romance

2  

SUNITA DAHIBHATE

Romance

तुझी सोबत हवी होती

तुझी सोबत हवी होती

1 min
83

चांदण्या रात्री हात हातात घेऊन फिरायला,

तू सोबती हवा होतास


वेणीत माळलेल्या फुलांचा सुगंध घ्यायला,

तू सोबती हवा होतास


गुलाबी थंडीत उबदार मिठीत विरघळायला,

तू सोबती हवा होतास


साजशृंगार करून सोबत माझ्या मिरवायला,

तू सोबती हवा होतास


निराशेच्या क्षणी आशेचा किरण फुलवायला,

तू सोबती हवा होतास


अडखळलेल्या माझ्या पावलांना सावरायला,

तू सोबती हवा होतास


शेवटपर्यंत आयुष्यात आनंदी जीवन जगायला,

तू सोबती हवा होतास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance