दीपावली आली...
दीपावली आली...
दिवाळी आली दिवाळी आली,
सर्वांची खरेदीची लगबग सुरू झाली ।।1।।
फुले तोरणांची माळ दारावर सजली,
पणत्या रांगोळ्यांनी दरवाजात गर्दी केली।।2।।
करंज्या,चकली,लाडूची मागणी वाढली ,
आईने जागून फराळाची तयारी केली।।3।।
दिवाळीची पहीली पहाट उगवली,
सर्वांच्या घरात नवचैतन्य घेऊनी आली।।4।।
सुगंधी उटणे आणि मोती साबणाने,
सर्वांनी छान छान मस्त आंघोळ केली।।5।।
देवाची पूजाअर्चा, गोड नेवैदय देऊन,
देवघरातील देवांची भक्तिभावे पुजा झाली।।6।।
अनेक गोड पक्वानांनी ताटे सजली,
नविन वस्त्रे परिधान करुन लहान थोर नटली।।7।।
एकमेकांना दिवाळीची शुभेच्छा देऊन,
दिवाळी उत्साहात सर्वांनी साजरी केली।।8।।
