सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई ती,
पत्नी ज्योतिबाची |
फुलेंची ती सून,
आई या जगाची ||..... (1)
केली सुरू शाळा,
तिने मुलींसाठी |
जगी पहिल्यांदा,
ही शिकण्यासाठी ||..... (2)
स्त्रीच्या शिक्षणाची
खरी ती कैवारी |
म्हणूनी शिकली
प्रत्येक ही नारी ||..... (3)
दिले तिने आम्हां,
हे विद्येचे ज्ञान |
लेकी तिच्या सर्व,
झाल्यात सज्ञान ||..... (4)
फेकले लोकांनी
तिच्यावर शेण |
तरी पुढे आली
द्यावया शिक्षण ||..... (5)
सोसले तिने रे,
दगड नि धोंडे |
रोवले जगात
शिक्षणाचे झेंडे ||..... (6)
गोवर्धन म्हणे,
नेहमीच स्मरा |
सावित्रीचा तुम्ही,
जयकार करा ||..... (7)
