सावित्री
सावित्री
गवताचा भारा डोक्यावर घेऊन
सावित्री....
धावत धावत गाडीला आली...
गवताचा भारा ...
गाडीत टाकताच
साहेब लोक छी... थु... करु लागली...
सावित्री म्हणाली....
"तुम्ही लोकांनीच जिणं आमच हराम केलयं.....
तेंव्हा साहेब लोक...
आणखीनच टाकुन बोलु लागली...
सावित्री खवळली....
म्हणाली....
साहेब... आता अधिक बोललात तर....
हातात विळी हाय.... !
