STORYMIRROR

Sushama Gangulwar

Inspirational

3  

Sushama Gangulwar

Inspirational

सावित्री

सावित्री

1 min
455

सावित्री बाई फूले नी 

गिरवले होते पाठीवर अक्षर 

म्हनून आज बहुतांश स्त्रिया 

शिकून झाले साक्षर 


लोकांच्या बोलण्याची तिने 

नाही बाळगली तमा 

म्हनून तर शिकण्यासाठी 

कित्येक स्त्रियांना केले जमा 


शेन ,गोट्या ,दगडाने 

खाल्ली ती अनेकांचे मार 

पण हजारो स्त्रियांना 

शिक्षणासाठी उघडे केले दार 


तिच्या उपक्रमाचा लोकांनी 

केले कित्येकदा उलंघन 

तरी ती निर्भीड पणे राहीली 

आपल्या कार्यावर टिकून संलग्न 


चूल आणि मूल इथून 

स्त्रियांना केले थोडेसे दुर 

तेव्हा पासून स्त्रियांच्या 

जीवनाला मिळाले नवीन सूर 


स्त्री शिक्षणाचे सावित्रीने 

घेतले मनापासून वसा 

पहिली स्त्री शिक्षिका म्हणुन 

तिने उमटविला ठसा 


पहिली महिला शाळा 

काढली ती पुण्यात 

स्त्रियांना साक्षर करण्याचे 

तिने ठाणल होत मनात 


 समाजने तिला किती त्रास दिले 

आणि किती बनले क्रूर 

त्यांच्यावर केले मात सावित्रीने 

म्हनून आज किती घडले कोहिनूर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational