साथ
साथ
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर
साथ मला देशील का ?
होता अंधकार सर्वत्र...
अंधारा मधे चालताना...
साथ मला देशील का??
सूर्याच्या उन्हात तापत असताना...
तुझ्या सावलीची साथ मला देशील का??
चंद्राचा गारवा असताना...
मिठीत तुझ्या उब मला देशील का??
रागाच्या भरात काही बोललो तर...
प्रेमाने मला माफ करशील का...
सोडून न जाता साथ मला देशील का??
चुकता क्षणी तो पाऊल माझा ...
पाऊल सावरण्यास साथ मला देशील का??
शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत....
साथ तुझी हवी आहे...
जीवनाच्या प्रत्येक वळणावरती...
साथ तुझी मला देशील का??
आनंदाने बहरून जाता...
त्या आनंदाला वाटण्यासाठी..
साथ तुझी असू दे.....
मी तुझा अन् तू माझीच असू दे.....
साथ अशीच असू दे, अशीच असू दे...

