STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Drama

3  

Rajendrakumar Shelke

Drama

साथ चांदण्यांची..!

साथ चांदण्यांची..!

1 min
261

************************

अशा या चांदराती

घेतली शपथ *प्रेमाची,*

नदीच्या काठावरी

सोबतीला साक्ष *चंद्राची.*


तुझे रूप पाहता

नभांगणी चंद्र *लाजला,*

तारका हसताना

चंद्रही असा *वेडावला.*


वाऱ्याची ती झुळूक

अलगद स्पर्शून *गेली,*

चंदेरी प्रकाशात

मनी वीज हि *चमकली.*


निसर्ग पाहताना

प्रेमात रंग भरे *मनी,*

लुकलूकते तारे

चंद्रप्रकाश तो *पाहुनी.*


क्षण हे फुलताना

आठवण ती *चांदराती,*

तुज कवेत घेता

प्रीतीस आलीया *भरती.*

--------------------------------------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama