सात जन्माची साथ
सात जन्माची साथ
सप्तपदी चालताना
एक आहे आस मनी
दे सात जन्माची साथ
तुजवीण नाही कुणी १
सुख दुःखाच्या बाजारी
मागतो एक सजना
दे सात जन्माची साथ
कसे समजावे मना २
नाही कुणी माझे दूजे
दे सात जन्माची साथ
या मायावी बाजारात
चालू नित्य साथ साथ ३
मिळो तुझी साथ प्रिये
हिच आस मनी राहे
दे सात जन्माची साथ
दुजे मज नको आहे ४
जागृती सुषुप्ती स्वप्नी
एकच मागतो आहे
दे सात जन्माची साथ
तुझी मुर्ती हृदयात राहे ५
