STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

सारीपाट

सारीपाट

1 min
371

जीवनाच्या सारीपटावर

कधी हार तर लाभे जीत

खिलाडूपणा बाणव मनी

महत्वाचे जाण मनमीत


प्रारब्धाप्रमाणे सुखदुःख

जगतनियंता सर्वां देतो

कधी शिडीने यश अर्पितो

सर्पगिळंकृत खाली आणतो


जीवनात साधना अनेक

कष्टप्रयत्नाने साध्य होती

कधी आघाडी कधी पिछाडी

पात्रता नित सिद्ध करती


कधी मित्र पैल यशोतीरी

मान मोद सखया तयात

नको तुलना नकोच ईर्षा

मर्म खेळाचे जाण मनात


कोणी होई सर्पगिळंकृत

साथ तयाला मृदु शब्दांची

हात तुझा देईल तयाला

उभारी झणी पुढे जाण्याची


जीवनसार खूपच सोपे

मिळेल तेवढे घे मनुजा

घेई आनंदकंद भरुनी

सुखदुःखांची नकोच तमा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract