STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

सारे काही सत्तेसाठी

सारे काही सत्तेसाठी

1 min
785


सारे काही सत्तेसाठी


लग्न असो वा अंत्यविधी

तिथे आम्ही हजर असतो

चाले सारे काही सत्तेसाठी

मतदार नावे गजर असतो


कोणी निंदो अथवा वंदो

फरक आम्हा पडत नाही

आम्ही निघून गेलो तरीही

कुणीच कधी रडत नाही


याचे घर नि त्याचे दार

फिरत असतो दारोदार

मतासाठी गाढवाच्या

पाया पडायलाही तयार


असो कुठे रानात वनात

सदा असे ध्यानात मनात

घरात झोपेतही आम्हाला

सत्तेची खुर्ची दिसे स्वप्नात


सत्ता हाती आल्यावरती

करतो आम्ही जनसेवा

जनतेच्या हातावर तुरी

हदडून कसा खातो मेवा


जनसेवा करता घरासाठी

वेळच नसतो आम्हाला

सदा न कदा जीव आमचा

सत्तेसाठीच हो हपापलेला


चुकांसाठी सदा जबाबदार

आमचा विरोधकच असतो

घरात मूल जन्मले तरीही

हात विरोधकांचा दिसतो

*****


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy