STORYMIRROR

Priti Dabade

Classics

4  

Priti Dabade

Classics

साप्ताहिक

साप्ताहिक

1 min
181

रविवार भास्कराची

उपासना करण्याचा

सोमवार शंकराला

बेलपत्र वहाण्याचा


वायूपुत्र हनुमान

मान मंगळवारचा

अकरावा अवतार

म्हणतात शंकराचा


विठ्ठलाच्या कीर्तनात

दंग व्हावे बुधवारी

स्वामी समर्थांचा जप

भक्त करी गुरुवारी


सात वाजताच होते

वेळ दिवे लागण्याची

भक्तिभावे पूजाअर्चा

शुक्रवारी ही लक्ष्मीची


शनिवारी पूजनेने

शनिकृपा कशी होई

मन शांत होऊनिया

साडेसाती मग जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics