सापळे साकड्यांचे
सापळे साकड्यांचे
साकडे घालून रोज देवाला
वाकडे बोलती रोज लोकाला
स्वतःसाठी घालून सर्वांस लादले
आपसूक स्वार्थासाठी पायी तुडविले
बोलणं कोड्यातल नजर चुकवत
खोट्या साकड्यांना दंडवत घालत
ओठात, पोटात एकींचा ह्रास
सापळे साकड्यांचे खेळती भावनास
विसरतात स्वतःचे सारे बोल
खोट्याला लपेटून घेतात गोल
