सांज वळीव
सांज वळीव
जमले गगनी काळे मेघ
पडला धरणीवर अंधार
वारे वाहती चौफेर
घुमती सार्या रानभर
थंड गारवा अंगाला
लागली चाहूल वळवाची
झाल्या सरीवर सारी चालू
झाली सुरुवात पाऊसाची
पडे, सरीवर सरी
पाणी, पाणी शिवारी
झाले आकाश निरभ्र
झाडे वेली नाहली भूवरी
पक्ष्यांची मनसोक्त अंघोळ
अंग झाले निर्मळ
झाडे,वेली,बहरल्या
वळीवाने घातली अंघोळ
प्राणी पाऊसाने भिजले
झटकती त्यांच्या अंगाला
घेती झाडाचा आधार
रात्री शांत निजण्याला
गाई,गुराखी वाटाने
गावाकडे निघाले
काळोखाच्या अगोदर
सारे गावात पोहचले
गावी दिवे लागले
चुल्ही गावच्या पेटल्या
गावच्या सर्व नारी
स्वयंपाकात गुंतल्या
रोजच्या दिवसापेक्षा
लोक लवकर जेवले
वळीवाच्या आनंदाने
शांत, समाधानी झोपले
