STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

4  

Dinesh Kamble

Tragedy

सांज नवेली..

सांज नवेली..

1 min
476


म्हातारपणाकडे झुकलेला

एक बाप ज्याची सहचारिणी सुद्दा

अर्ध्यातच साथ सोडून

गेली आहे.

तेव्हा आपल्या एकुलत्या एका लेकीची सासरी पाठवणी करतांना

त्या लाडक्या लेकीकडे कदाचित

असेच काहितरी मागणे मागत असावा..

_____________________________


सांज...

___________________________


सांज आजची नवेली

आली माझ्या ग अंगणी.

तुझ साठवू दे रूप

बाप ओल्या मी नयनी..


घडीभर घे विसावा.

पोरी साजऱ्या डोलीत..

खूप होता ग गोडवा.

तुझ्या बोबड्या बोलीत...


करे हट्ट तू लाडाने.

पुरविले मी ते सारे...

तुझ्या हसण्यापुढे ग

फिके वाटे चंद्र तारे..


होते वचन तू दिले .

प्रिये बाबाला या तुझ्या...

नाही सोडून जाणार.

होती घरट्याला माझ्या...


उद्या होईल ग जेंव्हा.

तुझा तात हा म्हातारा...

आई बनुनी ग तेव्हा.

मला देशील सहारा...


लेकी तुझ्या रुपी मला.

माझी माऊली दिसेल...

किती अनोख ते नात.

बाप लेकीच असेल...


माझ्या म्हातारपणाची.

बेटा तूच व्हावे काठी..

जन्म मला ग मिळावा .

माझ्या लेकीच्याच पोटी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy