STORYMIRROR

Raakesh More

Romance Others

3  

Raakesh More

Romance Others

सांगशील का

सांगशील का

1 min
50

काय होतं ते सांगशील का 

जे मी तुझ्या डोळ्यात पाहिलं 

अजून उत्तर मिळालं नाही 

एक कोडंच जसं मनात राहिलं || 0 ||


मी प्रेम समजू का 

हा विचार पडला होता 

एक रोग मनाला 

नकळत का जडला होता 

माझं जीवन जसं 

होतं तुझ्या साठी वाहिलं 

अजून उत्तर मिळालं नाही 

एक कोडंच जसं मनात राहिलं || 1 ||


कसं तूला विचारावं 

उपाय काही सापडला नाही 

माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील 

प्रसंग असा घडला नाही 

किती वेदना किती दुःख 

मी होतं तेंव्हा साहीलं 

अजून उत्तर मिळालं नाही 

एक कोडंच जसं मनात राहिलं || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance