सांगावे तूला....
सांगावे तूला....
पाहिले पहिल्यांदा तूला.
तेव्हा सांगावस वाटलं
आवडतेस खूप तू मला.
भीतीमुळे भिन्न झालो.
तुझ्या एकाचं नजरेने प्रेमात पडलो
तूला बघता बघता धडपडलो.
काय, काय चालू झाले आहे मना मध्ये.
उत्तान मांडला आहे हृदयाने,
खळबळ चालू होती हरवले काही तरी,
फुल ते पूर्णिमेचं उठून दिसे चांदण्यानं मध्ये.
सांगावे तूला तेव्हा खूप प्रेम आलं होत.
नव्हती तिथे तू तरी तुला मिठीत घट पकडलं होत.
उद्या शाळेत जाणार.
तूला विचारनार.
पुरी रात्र विचारत गेली.
लाल डोळ्यांना कळ आली.
सांगाचे होते तूला,
सांगता आलेचं नाही.
किती रात्र अशा गेल्या,
सकाळी काही तुला बोलताच जमेना
सांगावी तूला ति तडफ
ति तूला आणि तूलाच शोधत असे.
चोरूनं पण मनापासून प्रेम केल
नकार देशील म्हणून नाही सांगितलं.
सांगावे तूला तेवढे कमी आहे.

