STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Inspirational

4  

Vasudeo Gumatkar

Inspirational

सांग सूर्या

सांग सूर्या

1 min
407


किती तापतयं ऊन

होते जीवाची आग

तोडली झाडे खूप

सूर्य काढतोय राग


शोधतो आज तू

सावली विश्रांतीला

झाडे तोडताना

तेव्हा विचार न केला


घामाच्या धारा

खूप वाहू लागल्या

उष्णतेच्या झळा

आता लागू राहिल्या


उष्माघाताची आता

वाटते खूप भिती

सांग सूर्या मला

आग ओकशील किती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational