सांग ना रे बाप्पा मले...
सांग ना रे बाप्पा मले...
सांग ना रे बाप्पा मले
काय केला व्हता म्या गुन्हा,
ज्यानं तू मले दिला
अनाथ, निराधाराचा दुवा.
सांग ना रे बाप्पा मले
काय व्हती माझी चूक,
ज्यानं मले हिंडाव लागतंय
घरोदारी भूक-भूक.
सांग ना रे बाप्पा मले
असा कसा तू निर्दयी,
माझ्या ह्रदयाच्या वेदना
कशा तुला ठाऊक नाही.
माफ कर मले बाप्पा
तुले सांगून आता काय नाय व्हायचं,
माझं जीवन हाय
आता मलेच फुलवायचं
